Рассказ Виктора Руденко «Утро в горах» об Афганской войне переведен на язык махараджи

Виктор Руденко – участник боевых действий на территории Афганистана, служил в инженерно-саперной роте 191 ОМСП с 1985 по 1987 гг. Сегодня он главный редактор воронежской газеты «Коммуна», автор многочисленных рассказов и очерков об Афганской войне, член Альянса руководителей региональных СМИ России

Фото со страницы Видии Сварг в «Фейсбук»

В канун 31-й годовщины со дня вывода советских войск из Афганистана его миниатюру «Утро в горах» мы опубликовали на сайте АРС-ПРЕСС. Публикация получила неожиданное продолжение в «Фейсбуке» – на рассказ обратила внимание Видия Сварг и впервые перевела его на один из индийских языков махараджи.

Сейчас Видия постоянно живет в Индии. После окончания факультета журналистики Воронежского государственного университета долгое время работала в Российском центре науки и культуры в Мумбаи, свободно говорит на английском и русском языках, преподает и переводит с хинди и махараджи.

В предисловии к миниатюре Видия тепло рассказывает о своем знакомстве с Виктором в Воронеже в студенческие годы, вспоминает, как они вместе учились в университете, как ее русский друг и однокурсник был призван в армию и попал в Афганистан, как вернулся и начал серьезно заниматься журналистикой.

Видия часто бывает в России, – рассказывает Виктор. – Мало того, она была на моей свадьбе в 1989 году в небольшом поселке. Помню, когда она приехала со своими соотечественниками, случился небольшой переполох: местные впервые увидели настоящих индийцев, о которых знали только по фильмам.

С тех пор прошло 30 лет, Виктор Руденко и Видия Сварг не потерялись и по-прежнему дружат. Правда, теперь чаще виртуально: на русском и махараджи.

Виктор Руденко

अफगाण युद्धातील सैनिक ते एक यशस्वी संपादकमित्र...

विक्तर रुदेन्को, अफगाण युद्धातील एक रशियन सैनिक, नुकतीच शाळा संपवून 1984 मध्ये विद्यापीठात पत्रकारितेसाठी प्रवेश घेतला आणि त्यावेळच्या सोव्हिएत युनियनच्या कायद्याप्रमाणे एक वर्षांनी म्हणजे 1985 मध्ये त्याला लष्करात जाण्याचे आदेश आले, त्यावेळी तो फक्त 19 वर्षांचा होता. त्यावेळेस सोव्हिएत युनियनच्या फौजा अफगाणिस्तान मध्ये लढत होत्या. साधारणतः सहा महिन्याचे त्याला प्रशिक्षण देण्यात आले आणि ज्युनिअर कमांडर म्हणून त्याची पोस्टिंग काबूल, अफगाणिस्तानात करण्यात आली. तिथून त्याच्या रेजिमेंटला गाझनीला पाठवण्यात आले. या गाझनीचे वैशिष्ट असे की, 19 व्या शतकाच्या मध्यास झालेल्या पहिल्या युद्धादरम्यान ब्रिटिश रेजिमेंटला इथे पराभूत व्हावे लागले होते.

मे 1987 मध्ये त्याचे काम संपवून पुन्हा आला. पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षाला सुरुवात झाली, शिक्षण पूर्ण झाल्यावर विविध वर्तमानपत्रात त्याने काम केले.

विक्तर आज रशियातील वारोनियझ या शहरातील *कमुना* या दैनिकाचा संपादक म्हणून कार्यरत आहे. अतिशय शांत, सुस्वभावी, कधीही मदत करायला धाऊन येणारा विक्तर त्याची पत्नी ओल्गा, मी एकाच वेळेस विद्यापीठात शिकत होतो. दोघेही माझे खूप सिनिअर होते, पण ओल्गा माझीही मैत्रीण असल्याने त्यांनी माझ्यासह काही भारतीयांना त्यांच्या लग्नालाही बोलावले होते आणि त्यामुळे रशियन लग्न प्रथमच अगदी जवळून अनुभवता आले.

विक्तरच्या वर्तमानपत्रात काल त्याने अफगाण युद्धातील एक अनुभव कथन केले आहे आणि काही फोटोही टाकले आहे...ते फ़ोटो पाहिल्यावर मन विचलित झाल्याशिवाय राहत नाही...आज इतक्या वर्षानंतर मागे वळून बघतांना एकच म्हणावसं वाटते काळ आला होता पण वेळ नव्हती आली ...तर विक्तर म्हणतो, *तो प्रसंग आठवून आजही मला प्रत्येक 15 फेब्रुवारीला (युद्ध थांबल्याचा दिवस) पुनः नव्याने जन्मल्यासारखे वाटते*

तो त्याच्या जीवावर बेतलेला एक प्रसंग शब्दबद्ध करतो:

– कॉम्रेड लेफ्टनंट, तिकडे कुंपणाबाहेर काहीतरी हालचाल जाणवतेय, पेत्रिकने तुटक-तुटक शब्दात अतिशय हळू आवाजात सांगितले.

'कुठे?' होय...दुश्मन, हे दुश्मन माणसं आहेत! (रशियन मध्ये दूखी-असा शब्द वापरला आहे, म्हणजे अत्तर आणि इथे त्या कोडवर्डचा अर्थ दुश्मन असा आहे.) परंतु, अधिकाऱ्यांनी शांत राहणेच पसंत केले. “ठीक आहे तुमची हत्यारे तयार ठेवा!” किती बॉम्ब शिल्लक आहेत? रुदिक, (हे विक्तरला संबोधून त्याचे आडनाव रुदेन्को आहे.) लवकर लवकर! पण गडबड करू नको! सर्व सावज टिपण्यासाठी सज्ज रहा!.

इतक्यात एका अधिकाऱ्याने मला मास्क घालायला मदत करण्यासाठी बंकरमध्ये उडी घेतली.

– “चला आता इथून बाहेर निघा.”

कोणाच्याही मागे धावण्याची गरज नव्हती. पण सगळ्यांना माहिती होते, की कोणत्याही प्रसंगी फायरिंग सुरु होईल. सर्वजण तयारीतच होते. प्रचंड तणाव वाढला होता, आणि मनात एकदम जगण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती, काहीही झाले तरी या धोक्यातून बाहेर पडणे आवश्यक होते.

आणि लगेच, एका श्वासात, आम्ही या दोलायमान परिस्थितीतून बाहेर पडलो. आम्ही काही वेळा वर आणि खाली उडया मारल्या...मात्र तिथे वाढलेल्या झुडपाने आम्हाला झाकून चांगले संरक्षण दिले होते...

आम्ही पटकन पर्वतांच्या रांगामधून खालच्या बाजूने- उताराकडे पहाड आणि झऱ्यांच्याकडेने अरुंद दरीतून झपझप चालत निघालो, अशाच एका नागमोडी वळणावर, आमच्या पाठीमागे स्फोट झाल्याचा आवाज आला.

“शिकार जाळ्यात सापडलीय तर...ते सापडलेय त्यात...” अतिशय उत्साहात पण प्रचंड रागाने आमच्या अधिकाऱ्याचे उद्गार होते. सोव्हिएत फौजाना संरक्षण देण्यासाठी आम्ही जमिनीत पेरून ठेवलेल्या सुरुंगात दुष्मन अडकला होता.

कोणताही शब्द न उच्चारता, आम्ही वेगाने पुढे पावले टाकत होतो.

सकाळ होईपर्यंत आमचा रस्ता कापणे चालूच होते. सूर्योदयापर्यंत आम्हाला आमच्या कॅम्पपर्यंत पोहोचायचे होते, पण तेवढा वेळ नव्हता. अगदी अंतिम चढाई सुरु असतानाच, एका खंदकातून बाहेर निघतांना, आमच्यामागून सूर्य उगवतांना दिसत होता.

सूर्याची पहिली किरणे धरतीवर पडली होती, आजूबाजूचे सौंदर्य पाहून आश्चर्यचकित झालो होतो. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. अगदी काहीच काळापूर्वी, एका कठीण प्रसंगातून वाचलो होतो. उद्याचा दिवस पाहतो का नाही असा प्रसंग होता तो... आणि आता हे धोक्याच्या ठिकाणापासून दूर आलो होतो...आणि इथे...हे असे अचानक समोर आलेले सृष्टीसौंदर्य!

हळूहळू भव्य असा सूर्याचा गोळा वर येत होता. सूर्याची किरणे पहाडावरचा बर्फ सहज वितळवत असल्यासारखे वाटत होते. खूप सुंदर दृष्य होते ते! — पहाडाची मागची बाजू अजूनही काळी होती, सूर्याची किरणे अजून तिथे पोहोचली नव्हती, तिथे अजूनही रात्र होती. एकाच वेळेस दिवस आणि रात्रीची अनुभूती घेत होतो.

आणि अखेरीस सूर्य क्षितिजावर आला, आणि अगदी काही सेकंदातच मागे वळून बघतो तर सर्वत्र पहाड सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाली होती.

मनात विचार आला हा दिवस रात्रीचा खेळ हजारो वर्षांपासून चालू आहे आणि चालू राहील...

खंदकाच्या आजूबाजूला काटेरी झुडपं वाढली होती, पुढे छोटी, बारीक झाडे आणि इथे मोठी झाडेही दिसत होती, एका पहाडाच्या उतारावर अगदी सफरचंदाची बाग वाढत होती.

सूर्याने आम्हाला चांगलेच गरम केले होते असे मला वाटत होते.

मला माहित नाही बाकीच्यांची मनातही असाच विचार आला असेल का, ते सर्वच शांत होते.

वास्तविक, शांत कसले, आपला श्वास थांबू नये म्हणून, सर्वांचे जोरात श्वास घेणे सुरू होते.

विचत्र, विरोधाभास होता तो..., आमच्या हातातल्या बंदुका, आम्ही काय करत होतो आणि सभोवतालीचे निसर्ग सौंदर्य... हे निसर्गसौंदर्य भुरळ घालत होत खरं, पण आम्ही युद्धावर होतो, आणि आम्हा प्रत्येकापुढे एकच प्रश्न होता आणि तो म्हणजे परिस्थितीवर मात करून जीवन जगण्याचा...

История участия СССР в афганском конфликте – в материале ТАСС.

0 лайков